अनुभवी उमेदवारांमुळे जनमत राष्ट्रवादीच्या बाजूने – प्रभात चर्चा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आखलेली रणनिती यशस्वी ठरत असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. शेखर अण्णा चिंचवडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलली असून, पक्षाचे संपूर्ण पॅनल अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक १७ मध्ये सामाजिक समतोल आणि स्थानिक विश्वास लक्षात घेऊन अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यानुसार—
• १७ अ (अनुसूचित जाती – महिला) : सौ. मनीषा राजेश आरसुळ
• १७ ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग) : भाऊसाहेब भोईर
• १७ क (सर्वसाधारण – महिला) : सौ. शोभा तानाजी वाल्हेकर
• १७ ड (सर्वसाधारण) : शेखर बबनराव चिंचवडे
यामध्ये भाऊसाहेब भोईर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ, अनुभवी, विश्वासू व जुने नेतृत्व मानले जात असून, त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा थेट फायदा संपूर्ण पॅनलला होणार असल्याची चर्चा कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये आहे. संघटन बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आणि स्थानिक प्रश्नांची सखोल जाण यामुळे पॅनलला स्थैर्य आणि दिशा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
विशेषतः शेखर अण्णा चिंचवडे यांच्या प्रवेशामुळे पॅनलला ठोस नेतृत्व मिळाले असून, दुसरीकडे भाऊसाहेब भोईर यांचा अनुभव हा पॅनलसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे अनुभव आणि नव्या ऊर्जेचा संगम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलमध्ये पाहायला मिळत आहे.
आतापर्यंत भाजपशी जोडले गेलेले शेखर चिंचवडे थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर आल्याने हा बदल केवळ पक्षांतर न राहता, भूमिका आणि विश्वासाचा राजकीय संदेश देणारा ठरला आहे. यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता वाढली असून, अंतर्गत नाराजीची चर्चा सुरू आहे.
एकीकडे अनुभवी नेतृत्व, तर दुसरीकडे महिलांमध्ये नविन युवा मनिषा राजेश आरसुळ आणी गावावाले महिला उमेदवार शोभाताई वाल्हेकर यांच्या मुळे पॅनल मजबूत झाले आहे , विविध समाजघटकांना दिलेले प्रतिनिधित्व यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने “नाव नव्हे, काम महत्त्वाचे” हा स्पष्ट संदेश दिला आहे. त्यामुळेच प्रभाग १७ मध्ये पक्षाबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले असून, प्रभात चर्चेत राष्ट्रवादीचे पॅनल सध्या आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.


