Wednesday, July 15, 2026
Homeताजी बातमीभाजपाच्या भ्रष्ट कारभारा विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस एकवटली….! राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक मोर्चा…!

भाजपाच्या भ्रष्ट कारभारा विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस एकवटली….! राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक मोर्चा…!

भाजपाने जनतेचा विश्वासघात केला आणि करदात्या जनतेची प्रचंड लूट केल्याने आता विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरले, मागील पाच वर्षांतील असंख्य प्रकऱणांचा पंचनामा करायचा विडाच राष्ट्रवादीने उचलला आहे. स्मार्ट सिटीसह सगळी भ्रष्टाचाराची प्रकऱणे लोकांसमोर आणायची आणि भाजपाचा बुरखा फाडायचा यासाठी आज शुक्रवारी दि १८ रोजी सकाळी दहा वाजता महापालिका भवनावर एका भव्य मोर्चाचे आयोजन कऱण्यात आले होते.या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद मिळाला जवळपास दोनहजार लोक या मोर्चात सहभागी झाली होते.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो, भ्रष्टाचारी सत्ताधारी चले जाव, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा विजय असो आदी घोषणा देण्यात आल्या.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या भ्रष्ट कारभाराला पिंपरी चिंचवड शहरातील जनता वैतागली आहे. त्याचा रोष आज सगळीकडे व्यक्त होत आहे. सगळ्या गोष्टीत भ्रष्टाचार करणाऱ्या महापालिका सत्ताधाऱ्यांनी गरिबांच्या खिशावर डल्ला मारला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत सत्ताधारी भाजपाला उलथवून टाकू असे आवाहन माजी आमदार विलास लांडे यांनी केले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवत एकहाती सत्ता आणणार असल्याचे प्रतिपादन लांडे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ‘चले जाव भाजपा’ हे आंदोलन छेडले.चिंचवड स्टेशन येथून मोर्चाला सुरुवात झाली. पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या वेळी माजी आमदार विलास लांडे , शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाना काटे, विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, योगेश बहल, मंगला कदम, वैशाली काळभोर, सुलक्षणा शिलवंत, जगदिश शेट्टी, राहुल भोसले, प्रशांत शितोळे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विराज लांडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

महापालिकेतील भ्रष्ट सत्ता घालवून त्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य लोकांच्या हाती सत्ता आणायची आहे. राष्ट्रवादीने सत्ता असताना सर्वसामान्य लोकांची कामे केली. महापालिकेत विरोधी पक्षात असताना सर्वसामान्य लोकांचे प्रश्न राष्ट्रवादीतील लोकप्रतिनिधिनी महापालिकेत मांडले. सत्ताधारी भाजपाने इंद्रायणी नदीत सुधार प्रकल्पात घोटाळा केला, स्मार्ट सिटीच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरले, पाणी पुरवठा नियोजनात अपयश आले, कचऱ्याच्या प्रकल्पात घरातील लोकांना स्वतःच्या बगलबच्चना ठेका देऊन पैसे लाटले, चुकीचा वाढीव खर्च दाखवून निवडणुकांचा फ़ंड गोळा केला, विद्यार्थ्यांच्या गुडफिल किट मध्ये देखील पैसे खाल्ले अशा एक ना अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत.

आता एकजुटीच्या ताकदीवर तसेच पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीला सत्तेत आणू आणि या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना महापालिकेतून पायउतार करु, असे प्रतिपादन माजी आमदार विलास लांडे यांनी केले. त्यासाठी महिला, युवक, युवतींनी सज्ज होण्याचे आवाहन लांडे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments