Sunday, August 16, 2026
Homeगुन्हेगारीसुनेत्रा पवार यांच्यावरील अवमानकारक वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात...

सुनेत्रा पवार यांच्यावरील अवमानकारक वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तीव्र निषेध आंदोलन

महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही; विचारांवर राजकारण करा, वैयक्तिक टीका थांबवा – योगेश बहल

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित अवमानकारक आणि महिला विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (पिंपरी-चिंचवड शहर)च्या वतीने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी संबंधित वक्तव्याचा निषेध करत महिलांचा सन्मान अबाधित राखण्याची मागणी केली.

आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक योगेश बहल यांनी संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध केला. “महिलांचा अपमान हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि पुरोगामी परंपरेला काळिमा फासणारा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर उभा असलेला महाराष्ट्र महिलांचा अवमान कधीही सहन करणार नाही,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “राजकारण हे विकास, धोरणे आणि जनहिताच्या मुद्द्यांवर व्हावे. महिलांवर वैयक्तिक पातळीवर टीका करणे हा भ्याडपणा असून तो विचारांचा पराभव आहे. मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आपल्या संयमी, कार्यक्षम आणि जनतेप्रती समर्पित नेतृत्वातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याला उत्तर देता येत नसल्याने वैयक्तिक स्तरावर टीका करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे.”

महिलांचा सन्मान हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी तडजोडीचा विषय नसल्याचे स्पष्ट करत, कोणत्याही महिला नेत्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्यास पक्ष लोकशाहीच्या मार्गाने राज्यभर ठामपणे उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या शेवटी “महिलांचा सन्मान… महाराष्ट्राचा स्वाभिमान!” अशी घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments