Sunday, June 15, 2025
Homeताजी बातमीराष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आमदार अण्णा बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला...

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आमदार अण्णा बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट

१० जुलै २०२१,
आज राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार बनसोडे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली व पक्षाच्या जुन्या मातबर शिलेदारांना व युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पालिकेत महाविकासाआघाडीची सत्ता आणून म. वि. आ. चा महापौर कसा बनवता येईल या विषयी कानमंत्र दिला . यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आझमभाई पानसरे , आमदार अण्णा बनसोडे , माजी आमदार विलास लांडे , यांनी त्यांचे स्वागत केले

एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गणली जाणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आज या पालिकेवर कर्ज रोखी उभारण्याची वेळ आली आहे . गेल्या चार वर्षा पासून पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे , पालिकेच्या भोंगळ कारभाराला सामान्य जनता वैतागली आहे . कोरोना काळात पालिकेकडून भली मोठी आश्वासने देऊन ती न पाळून जनतेचा भ्रमनिरास केला आहे , या कोरोनाच्या महामारीत व्यावसायिकांचे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना पे अँड पार्क सारख्या योजना राबविण्यात आल्या ,ऐन पावसाळ्यात रस्ते खुदाईची कामे सुरु असून झोपडपट्टी व नागरी वस्तीतील लोकांना नाहक त्रास देण्याचे काम सुरु आहे . जनहितार्थ कामे करण्या ऐवजी जाहिरात बाजीवर भाजपाचा जास्त भर आहे असल्याचे दिसून येत आहे .

या सर्व अडचणी कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या कानावर घातल्या , यावर प्रदेशाध्यक्षांनी सामान्य कार्यकर्त्या पासून ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यापर्यंत सर्वानी एकजुटीने काम करून पक्ष संघटन कसे वाढवता येईल ,व पालिकेतील संख्या बळ कसे वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या . तसेच शहरातील सामान्य जनतेच्या ज्या काही अडी अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिकाधिक प्रयत्न करावा . तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून शहरातील नागरिक कसे सुरक्षित राहतील यावर जास्तीत जास्त प्रबोधन करण्यात यावे .

यावेळी त्यांनी आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाची ही पाहणी केली , बूथ कमिटी मजबून करण्यासाठी तयार केलेल्या संगणकीय प्रणालीचा आढावा घेतला व त्याचे कौतुक केले . कार्यालयातून सामान्य नागरिकांसाठी राज्य शासनाच्या शासकीय योजना कशा पद्धतीने राबविल्या जातात याचा देखील आढावा घेतला यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आझमभाई पानसरे , आमदार अण्णा बनसोडे , माजी आमदार विलास लांडे , माजी नगर सेवक जगदीश शेट्टी , निलेश शिंदे , ,नगरसेवक विक्रांत लांडे , बाळासाहेब ठाणगे , प्रसाद शेट्टी , प्रतीक इंगळे ,शशीकांत घुले , सुधाकर भोसले ,निहाल पानसरे , सयाजीराव पाटील , संजय औसरमल, शेखर कुटे , कष्टकरी संघर्ष महासंघाचे काशिनाथ नखाते , हे उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments