Tuesday, December 5, 2023
Homeताजी बातमीउपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार शरद पवारांच्या भेटीला...

उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार शरद पवारांच्या भेटीला…

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाआधी राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार काही आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले आहेत. यावरून राज्यातील राजकारण तापलेलं असताना राजकारणात आता पुन्हा एक ट्वीस्ट आला आहे. अजित पवारांसह गेलेल्या आमदारांनी वाय. बी. सेंटरवर शरद पवारांची भेट घेतली आहे. उद्यापासून (१७ जुलै) राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधीच बंडखोर आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बंडखोर आमदारांसोबत अजित पवारही आहेत.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवारांनी एकमेकांविरोधात कठोर भूमिका जाहीर केली होती. शरद पवारांवर टीका करताना अजित पवारांनी त्यांचं वयही बाहेर काढल, तर शरद पवारांनी त्यांचा फोटो वापरण्यासही मज्जाव केला. या दोन्ही मोठ्या नेत्यांचं नाराजीनाट्य टोकाला पोहोचलेलं असताना आता अजित पवारांनी त्यांच्या इतर बंडखोर आमदारांसह शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय नाट्य रंगण्याची शक्यता आहे.

कोण कोण गेलं भेटीला?

हसन मुश्रीफ, अजित पवार, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आदी नेते शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत.

मला फोन आला अन्…

यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “पवारांच्या भेटीला कोण आले आहे मला माहिती नाही. मला सुप्रिया सुळेंचा फोन आला, म्हणून मी वाय.बी.सेंटरला तातडीने दाखल झालो आहे. मला फक्त येथे भेटायला बोलावले आहे.”

आशीर्वाद घेण्यासाठी…

तर, शरद पवारांचा आशीर्वाद घ्यायला, मार्गदर्शन घेण्यासाठी हे बंडखोर आमदार पवारांच्या भेटीला गेले असतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments