Friday, June 13, 2025
Homeअर्थविश्वपुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत २१ पैकी १४ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर उर्वरित ७ पैकी ६ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, तर एका जागेवर भाजपने बाजी मारली. त्यामुळे एकहाती सत्ता मिळवण्याची स्वप्न पाहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे भाजप उमेदवार प्रदीप कंद यांना बारामतीमधून ५२ मतं मिळाली आहेत, त्यामुळे “साथ कोणी दिली? बारामती” अशा घोषणा कार्यकर्ते देत आहेत.

प्रतिष्ठेची लढत, राष्ट्रवादीचा पराभव…
राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या एका जागेवर पक्षाला दणका बसला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा पराभव केला आहे. सुरेश घुले यांचा १४ मतांनी पराभव झाला. अजित पवारांनी प्रचार सभेत कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, नेमकी तीच जागा जिंकण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरली आहे.

णे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार ७३ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील चांदेरे हे २७ मतांनी विजयी झाले आहेत. चांदेरे यांनी भाजपचे आत्माराम कलाटे यांना पराभूत केलं आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादीच्या पूजा बुट्टे पाटील आणि निर्मला जागडे यांचा विजय झाला, तर आशा बुचके यांना पराभवाचा धक्का बसला.

निवडणुकीचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धावतच रस्त्यावर गुलाल उधळून आनंदाला वाट मोकळी करून दिली. ढोलताशे वाजवत या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

अनेक वर्षांपासून या बँकेवर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे २१ पैकी २१ जागा होत्या. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या या निवडणुकीत २१ पैकी १४ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उरलेल्या सात जागांसाठी रविवार, दोन जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments