Monday, May 12, 2025
Homeताजी बातमी“...असं चाललं तर नोटेवर गांधींच्या ऐवजी मोदी स्वतःचाच फोटो लावतील”; नवाब मलिकांचा...

“…असं चाललं तर नोटेवर गांधींच्या ऐवजी मोदी स्वतःचाच फोटो लावतील”; नवाब मलिकांचा टोमणा

पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये याबाबत चांगलीच चूरस निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या धामधुमीतच आता लसीकरण प्रमाणपत्रामुळे वाद उभा राहिला आहे. तृणमूलने लसीकरण प्रमाणावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप घेत केंद्राकडे टीका केली होती. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मोदींना टोमणा मारला आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूपच पुढे निघून गेले आहेत. सर्व पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर मोदींचेच फोटो आहेत. जिकडे पहावं तिकडे मोदींचेच फोटो दिसतात. खादीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी स्वतःचा फोटो छापला. आता लसीकरण प्रमाणपत्रावरही मोदींनी स्वतःचा फोटो लावला आहे. हे असंच चालत राहिलं, तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतः फोटो छापतील,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Representational corona vaccination certificate

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने निवडणूक होणाऱ्या राज्यातील पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान मोदी यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटोही काढण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments