Wednesday, May 14, 2025
Homeताजी बातमीठाकरे-मुनगंटीवार भेटीवर भुजबळांची मार्मिक प्रतिक्रिया; म्हणाले...

ठाकरे-मुनगंटीवार भेटीवर भुजबळांची मार्मिक प्रतिक्रिया; म्हणाले…

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्यापासून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यातच महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. 

छगन भुजबळ आज पुण्यात होते. यावेळी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीबाबत विचारण्यात आलं. त्यावर मुख्यमंत्री राज्याचे आहेत. त्यांना कोणीही भेटू शकतात. मुनगंटीवार भेटू शकतात. फडणवीस भेटू शकतात. चंद्रकांतदादाही भेटू शकतात, असं सांगतानाच पक्षात येणार का म्हणून मुनगंटीवारांना विचारा, असं भुजबळ यांनी हसत हसत म्हणताच एकच हश्या पिकल्या.

काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे, त्याबाबत भुजबळ यांना विचारण्यात आले. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे विधानसभेचे अध्यक्षपद देण्याची चर्चा मीही ऐकून आहे. ही चर्चा थांबल्यावरच खरं काय ते कळेल, असं ते म्हणाले.

शेतकरी आंदोलनाबाबत तुम्ही तरी बोला

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत आपल्या देशातील सेलिब्रेटीजनी बाहेरच्या देशातील लोकांनी यावर बोलू नये असं मत व्यक्त केलंय. मग माझं त्यांना सांगणं आहे की, तुम्ही तरी त्यावर बोला. हा आपल्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे हे बरोबर आहे. पण इतके दिवस शेतकरी आंदोलन करतायत, रेल्वे ट्रॅकवर बसून, रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत, त्यावर पण बोलायला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments