Tuesday, January 13, 2026
Homeताजी बातमीराष्ट्रवादीने रणशिंग फुंकले.. तळवडेतील अजित पवारांच्या विजयी संकल्प सभेने प्रचाराची सुरुवात 

राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले.. तळवडेतील अजित पवारांच्या विजयी संकल्प सभेने प्रचाराची सुरुवात 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जोरदार ताकदीनिशी प्रचाराला सुरुवात केली असून, चिखली येथे आयोजित विजयी संकल्प सभेतून निवडणुकीचा बागुल वाजवत राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सभेत बोलताना मा. अजितदादा पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या सद्यस्थितीवर परखड शब्दांत भाष्य केले. वाढते महानगरपालिकेचे कर्ज, टँकर माफियाचा सुळसुळाट, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था आणि रखडलेली विकासकामे यामुळे शहराचा विकास ठप्प झाल्याची टीका त्यांनी केली. पुन्हा एकदा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली, तर महानगरपालिकेला कर्जमुक्त करून सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासन उभे करण्याचा ठाम संकल्प त्यांनी व्यक्त केला.

“तुम्ही मला नवीन नाही आणि मी तुम्हाला नवीन नाही; १९९१ साली तुम्हीच मला खासदार केले,” असे सांगत त्यांनी नागरिकांशी असलेल्या जुन्या नात्यांचा आणि विश्वासाचा उल्लेख केला. पिंपरी-चिंचवड हे शहर वारकरी संप्रदायाची परंपरा, शिव–शाहू–फुले–आंबेडकर विचारसरणी आणि सर्व धर्म–सर्व समाजाच्या सलोख्याचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मी कामाचा माणूस असून सकाळी सहा वाजल्यापासून कामाला लागतो, असे सांगत मा. अजितदादांनी येत्या १५ जानेवारी रोजी ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

या विजयी संकल्प सभेला पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच चिखली व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments