Thursday, May 15, 2025
Homeताजी बातमीसदाभाऊ यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे जोरदार उत्तर, म्हणाले 'शेवटी सरड्याची उडी कुंपणापर्यंतच असते'

सदाभाऊ यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे जोरदार उत्तर, म्हणाले ‘शेवटी सरड्याची उडी कुंपणापर्यंतच असते’

“एखाद्या क्रीडा संघटनेचे अध्यक्ष होण्यासाठी तो खेळ खेळलेला असणे गरजेचे नाही. क्रिकेटमधील कसोटीपटूंच्या मानधनात वाढ झाली. यामागे कोणाचे कष्ट आहेत, याची माहिती रयत क्रांती संघटनेचे नेते तथा आमदार सदाभाऊ खोत यांना कशी होणार, शेवटी सरड्याची उडी कुंपणापर्यंतच असते,” अशी टीका केली आहे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी.

शेतकरी आंदोलनावर भाष्य केल्यानंतर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल शरद पवार यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर “पवार कधी क्रिकेट खेळले होते का? सध्या ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी कधी कुस्ती खेळली होती?,” टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे खोतांचा समाचार घेतला.

“शरद पवार यांनी कुस्ती, क्रिकेट, कबड्डी, खोखो अशा अनेक संघटनांचे राज्य पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक पदे भूषवली आहेत. ही पदे भूषवताना ते हे खेळ प्रत्यक्ष खेळले नसले तरी त्यांनी खेळांच्या वाढीसाठी जाणीवपूर्वक लक्ष दिले. क्रिकेटमधील कसोटीपटूंच्या मानधनात झालेली वाढ, यामागे कोणाचे कष्ट आहेत, याची माहिती सदाभाऊ यांना कशी होणार?, शेवटी सरड्याची उडी कुंपणापर्यंतच असते,” असे काकडे म्हणाले.

तसेच, सचिनचा राजकारणासाठी वापर करून घेणे चुकीचे आहे. शरद पवारांनी सचिनला सल्ला देणं यात काय वावगं?, असा प्रतिप्रश्नही त्यांनी विरोधकांना केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments