झारखंड येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात सैन्यदलाचे तीन जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या ‘आयडी’ च्या स्फोटात झारखंड जगुआर युनिटचे तीन जवान शहीद झाले, तर अन्य दोन जवान जखमी झाले. सीआरपीएफ आणि झारखंड जग्वार यांचे संयुक्त पथक शोध मोहीम राबवित असल्याची माहिती झारखंडचे डीजीपी नीरज सिन्हा यांनी दिली आहे.
आज(गुरूवार) सकाळी ८.४५ मिनिटांनी झारखंडमधील पश्चिम सिंगभूममधील होयाहातू गावच्या वनक्षेत्रात प्रेशर आयडीचा स्फोट झाला. झारखंड जगुआर ऑफ स्टेट पोलिसांचे दोन जवान या स्फोटामध्ये जखमी झाले आहेत. याशिवाय सीआरपीएफची १९७ बटालियनचा देखील एक जवान जखमी झाल्याची देखील माहिती मिळाली आहे.