२४ जानेवारी २०२०
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने कोणतेही आर्थिक वैशिष्टये, भरीव तरतूद तसेच कोणतेही नावीन्य नसलेला एकूण ६४० कोटी ८८ लाख १० हजार रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी सादर करण्यात आला. प्राधिकरणाने २०२०-२१ साठी सादर केलेला हा अर्थसंकल्पॅट ६४० कोटी ८२ लाख ९२ हजार इतका खर्च अपेक्षित आहेत. तसेच, अर्थसंकल्पानुसार ५ लाख १८ १८ हजार रुपये शिल्लक राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची ३४३ वि सभा अध्यक्ष सदाशिव खडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी प्रमोद यादव, मुख्य लेख अधिकारी भगवान घाडगे आणि विविध विभागांच्या प्रामुखांनी एकत्रिपणे हा अर्थसंकल्प तयार केला. दंडाची व व्याजाची रक्कम घटल्याने संकल्पावर परिणाम होऊन यंदाचा अर्थसंकल्प ३९ कोटी १ लाख ७६ हजाराच्या घातला आहे.