Wednesday, July 15, 2026
Homeताजी बातमीकाँग्रेसचा गुरुवारी पिंपरी चिंचवड मनपावर हंडा मोर्चा…

काँग्रेसचा गुरुवारी पिंपरी चिंचवड मनपावर हंडा मोर्चा…

पिंपरी चिंचवड मनपाच्या सार्वत्रिक निवडणूकांचा बिगुल वाजला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना वेठीस धरण्याचे काम मनपातील सत्ताधारी भाजप करीत आहे. मागील वर्षी पवना धरण क्षेत्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असतानाही शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नुकतेच पूर्ण शहरभर दररोज पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहे. तरीदेखील शहरात ठिक ठिकाणी अद्यापही टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.

शहरातील दाट वस्ती व झोपडपट्ट्यांमधील कमी दाबाने व अनियमितपणे पाणी पुरवठा होत आहे. यामुळेच शहरात दररोज पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी आणि मनपातील सत्ताधारी भाजपाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी दिनांक 24 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments