Friday, June 21, 2024
Homeबातम्यारविवारी पिंपरीतील रेल्वे स्टेशनचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते

रविवारी पिंपरीतील रेल्वे स्टेशनचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते

पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर आता रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाचे भुमीपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ऑनलाईन

देशातील रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने ‘अमृत भारत स्टेशन’ योजना हाती घेतली आहे. त्यात समाविष्ट पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी, तर मावळातील तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणावर सत्तर कोटी रुपये खर्च होणार आहेत. या कामाचे भूमिपूजन येत्या रविवारी (ता.६) पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन करणार आहेत.

पुणे दौऱ्यावर नुकत्याच (ता.१) येऊन गेलेल्या मोदींनी पुणे मेट्रोच्या दोन मार्गाच्या दुसऱ्या टप्यांचे उद्घाटन ऑनलाईन केले होते. त्यानंतर आता ते मध्य रेल्वेवरील दोन स्थानकांच्या कायापालट करण्याच्या कामाचे भूमिपूजन रविवारी ऑनलाईनच करणार आहेत. या दोन रेल्वे स्थानकांसह चिंचवड आणि देहूरोड या इतर दोन स्थानकांचे सुशोभीकरण याच योजनेच्या दुसऱ्या टप्यात केले जाणार आहे.

या चार स्थानकांचा अमृत योजनेत समावेश करण्यासाठी आपणच पाठपुरावा केला होता, असे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. सुभोभीकरणासह या स्थानकांचा विस्तारही केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तळेगाव दाभाडे आणि आकुर्डी रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी अनुक्रमे ४० कोटी ३५ लाख आणि ३३ कोटी ८ लाख रुपये खर्च होणार आहेत. त्यातून रेल्वे स्टेशनवर फुटओव्हर ब्रीज, प्रतीक्षालय, स्वच्छतागृह, दिव्यांगासाठी सोयीसुविधा, लिफ्ट, मोफत वाय-फाय, वाहनतळ होणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (ता.१ जुलै) पुणे दौऱ्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे (waste to energy project) ऑनलाईन उद्घाटन केले होते. त्यामुळे गेली ३३ वर्षे दुर्गंधीचा सामना करणाऱ्या मोशीकरांनी आनंदोत्सव केला होता. आता त्यानंतर पुन्हा मोदी पिंपरीतील रेल्वे स्टेशनच्या कामाचे ऑनलाईन भूमिपूजन करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments