म्यानमारमध्ये लष्कराने उठाव केला आहे. लष्कराने नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पार्टीच्या सर्वोच्च नेत्या आंग आन सू की यांना अटक केली असून सत्तापालट केला आहे. मात्र लष्कराने म्यानमारच्या संसदेत कश्याप्रकारे प्रवेश करून ही सत्तापालट केली आहे, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे एका महिला डान्सरने व्यायाम करतेवेळी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.
खिंग हनिन वाई असे या डान्सर महिलेचे नाव आहे. ही महिला म्यानमारच्या संसदेबाहेर व्यायाम करत होती. यावेळी एक व्यक्ती तिचा व्हिडीओ काढत होता. याच व्हिडीओमध्ये लष्कराने म्यानमारच्या संसदेत कशाप्रकारे प्रवेश केला ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तब्बल 12 लाखाहून अधिक व्यक्तींनी बघितला आहे.
म्यानमारमध्ये झालेल्या निवडणुकीत 8 नोव्हेंबर रोजी सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसीने 476 पैकी 396 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे आंग सान सू ची की यांना पाच वर्षासाठी सरकार बनविण्याची संधी देण्यात आली होती. तर, लष्कराचं समर्थन असलेल्या यूनियन सॉलिडेरिटी अँड डेव्हल्पमेंट पार्टीला केवळ 33 जागा जिंकता आल्या होत्या. लष्कराने या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. तसेच या निवडणुकीच्या निकालांचा फेर आढावा घेण्याची विनंतीही लष्कराने निवडणूक आयोगाला केली होती.
लष्कराने नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पार्टीच्या सर्वोच्च नेत्या आंग आन सू की यांना अटक केली असून सत्तापालट केला आहे. आंग सान सू की यांना ताब्यात घेतल्यानंतर देशात एक वर्षासाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. म्यानमारच्या सत्तेची सूत्रे आता वर्षभरासाठी लष्कराच्या ताब्यात राहणार आहे.