Thursday, February 6, 2025
Homeताजी बातमीएकतर्फी प्रेमातून विवाहित तरुणीचा विहिरीत ढकलून खून, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

एकतर्फी प्रेमातून विवाहित तरुणीचा विहिरीत ढकलून खून, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

२२ जानेवारी २०२१,
प्रेम प्रकरणातून अनेक गुन्हे झाल्याच्या घटना आपण पाहिल्या असतील असाच एक धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये समोर आला आहे. इथे एकतर्फी प्रेमातून विवाहित तरुणीचा विहिरीत ढकलून खून करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील देववाडी इथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

सांगली जिल्ह्यातील देववाडी इथं एकतर्फी प्रेमातून विवाहित तरुणीचा विहिरीत ढकलून खून करण्यात आला आहे. रुपाली मारुती खोत (वय 32) असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे. काल सायंकाळपासून महिला बेपत्ता होती. सगळीकडे तिचा शोध घेतला असता कुठेही पत्ता लागला नाही. अखेर आज विहिरीत तिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तपास सुरू झाला असल्याचंही सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,खून करणारा संशयित निवास खोत (वय – 20) हा तरुण घटनेनंतर पसार झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत. संशयीत निवास खोत हा गावातील महिलेची छेडछाड करत होता. मृत महिलेच्या समोरसुद्धा तो कपडे काढून उभा राहिला होता. पण महिलेने विरोध केला असता तिला विहिरीत ढकलून तिची हत्या केली.

दरम्यान, पोलिसांनी विहिरीतून महिलेचा मृतदेह बाहेर काढला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे. हत्या केलेला आरोपी अद्याप बाहेर मोकाट फिरत असल्यामुळे गावकऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण आहे. तर प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी आणि सतर्क राहावं अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments