प्राणाची बाजी लावून सुमारे २५ नागरिकांचे जीव वाचविणाऱ्या महापालिकेच्या अग्निशमन अधिकारी व कर्मचा-यांचा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते “शौर्य प्रमाणपत्र” देऊन सन्मान करण्यात आला.
महापालिकेच्या पिंपळे सौदागर परिसरातील रेनबो प्लाझा व्यावसायिक संकुलामध्ये दि.८ डिसेंबर २०२२ रोजी भीषण आग लागली होती. या आगीतून सुमारे २५ नागरिकांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान समारंभ महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत पारपडला, यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त तथा अग्निशमन विभाग प्रमुख विजयकुमार थोरात यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रातील पिंपळे सौदागर परिसरातील रेनबो प्लाझा व्यावसायिक संकुलामध्ये दि.८ डिसेंबर २०२२ रोजी भीषण आग लागली होती. लागलेल्या आगीमुळे सुमारे २५ नागरिक या इमारतीमध्ये अडकले होते. यावेळी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या यंत्रणेने प्राणाची बाजी लावून संकुलात अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचविले. तसेच लागलेली आग नियंत्रणात आणली. याबाबत अग्निशमन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचा आयुक्त तथा प्रशासक यांच्या हस्ते “शौर्य प्रमाणपत्र” देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये सुप्रीडेंट अग्निशमन अधिकारी प्रताप चव्हाण, टेक्निकल सब ऑफिसर सुमित गोडे, किशोर जाधव, लीडिंग फायरमन सारंग मंगरुळकर, संपत गौंड, फायरमन चेतन माने, कैलास वाघेरे, किरण निकाळजे, नामदेव वाघे, सरोष फुंडे, अनिल माने, विशाल पोटे, वाहन चालक रुपेश जाधव, प्रदीप भिलारे तसेच विवेक खांडेवाड या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.