कल्चर क्रेस्ट सोसायटीमधील सदनिका धारकांनी अनधिकृपणे कव्हर केलेल्या बाल्कनी, ग्रील, शेड, डक्ट, इमारतीचे सामासिक अंतर व अंतर्गत बदलावर कारवाई
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रिय कार्यालय, अतिक्रमण पथकाच्या मार्फ़त (दि. १२) रोजी प्रभाग क्र. २ व ८ मधील स्पाईन सिटी चौक (कल्चर क्रेस्ट सोसायटी) व पंतनगर, जाधववाडी येथील अनधिकृत बांधकामावरती निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सुमारे ४२१९ चौरस फ़ुट अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.आयुक्त शेखर सिंह व अति. आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
कल्चर क्रेस्ट सोसायटीमधील सदनिका धारकांनी अनधिकृपणे कव्हर केलेल्या बाल्कनी, ग्रील, शेड, डक्ट, इमारतीचे सामासिक अंतर व अंतर्गत बदल करण्यात आले होते, त्याबाबतच्या तक्रारी सोसायटीकडून प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने सदरची कारवाई करण्यात आली.

सोसायटी मधील सदनिका धारकांनी / नागरिकांनी अनधिकृपणे कव्हर केलेल्या बाल्कनी, ग्रील, शेड, डक्ट, इमारतीचे सामासिक अंतर व अंतर्गत बदल करु नये, या बाबत मनपा कडून आवाहन करण्यात आले. तसेच अशा प्रकारचे बदल करण्यात आले तर महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था कायदा १९६६ नुसार संस्थेचे परवानगीशिवाय बांधकामामध्ये बदल केल्यास आदर्श उपविधीच्या उपविधी क्र.१६६ अन्वये गृहरचना संस्थेने संबधितावर कारवाई सोसायटीने करावी अन्यथा मनपा मार्फ़त कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
या कारवाईत बीट निरीक्षक अतिक्रमण पथक प्रमुख संतोष शिरसाठ, कनिष्ठ अभियंता संदिप वैद्य, प्रसाद आल्हाट, निवृत्ती गुणवरे, योगेश शेवलकर, राजश्री सातळीकर, रिता जाधव, शितल भोसले व साधना ठोंबरे क प्रभाग अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र व पोलीस पथक सहभाग झाले होते. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे.
