१४ डिसेंबर
आज शनिवारी (दि. १४) रोजी माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा नियोजित दौरा पिंपरी चिंचवड शहरात होता. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांशी संवाद साधला.
आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग ठेवायचे की वार्ड पद्धतीने निवडणूक घ्यायची, असे अजित पवार यांनी नगरसेवकांना विचारले. त्यावर सर्व आजी-माजी नगरसेवकांनी द्विसदस्यीय पद्धतीने (वॉर्ड) घेण्याची मागणी केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये. मुंबई महापालिका सोडून द्विसदस्यीय पद्धतीने (वॉर्ड) घेण्याचा विचार आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित निर्णय घेतील, असे अजित पवार यांनी सांगितले.