Monday, May 11, 2026
Homeअर्थविश्वराज्यातील महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याची प्रक्रिया 23 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे. सादर करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी 31 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांना 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे.

3 जानेवारी 2026 रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.

महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

या निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments