Wednesday, July 15, 2026
Homeताजी बातमीमहापालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी…

महापालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी…

भजन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाद्वारे अज्ञान दूर करुन अंधश्रद्धा आणि अस्वच्छता निर्मूलनासाठी अथांग कार्य करणारे संत गाडगेबाबा हे थोर समाजसुधारक होते असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये त्यांच्या प्रतिमेस महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते नरेश कदम, भाई विशाल जाधव, सुनिल अभंग, किरण लोंढे, निलेश दळवी, मंदार सुळे, विविध कर्मचारी संघटनांचे अंबर चिंचवडे, बबन झिंजुर्डे, बाळासाहेब कापसे, मनोज माछरे, माया वाकडे, सुप्रिया सुरगुडे, गणेश भोसले आदी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, संत गाडगेबाबा यांनी गावोगावी जाऊन स्वच्छतेचा प्रचार केला. अंधश्रध्दा निर्मूलनासाठी जनजागृती केली. तसेच अज्ञान दूर करण्यासाठी किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनदेखील केले. स्वच्छतेसाठी आग्रही असणा-या संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त महापौर माई ढोरे यांनी शहरवासियांना शुभेच्छा दिल्या तसेच स्वच्छाग्रह मोहिमेत सहभाग घेऊन शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे असे आवाहनदेखील त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments