Tuesday, July 8, 2025
Homeताजी बातमीनिळ्यापूररेषीतील २७ अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर महापालिकेची कारवाई

निळ्यापूररेषीतील २७ अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर महापालिकेची कारवाई

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पवना, मुळा व इंद्रायणी या तीन नद्यांच्या निळ्या पुररेषेतील बांधकामांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या बांधकामापैकी अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर महापालिकेकडून मंगळवार, दिनांक २४ सप्टेंबर रोजीपासून कारवाई सुरु करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सर्वप्रथम अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाई सुरु केली असून मंगळवारी महापालिकेच्या ब, ड, इ क्षेत्रीय कार्यालयामधील तब्बल २७ अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाई करण्यात आली. यापुढे संपुर्ण बांधकामे निष्कासित करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अशी करण्यात आली ‘कारवाई’

महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ६ अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाई करण्यात येऊन अंदाजे ५५०० चौरस.फूट क्षेत्र पाडण्यात आले आहे. सदर कारवाईमध्ये २० एमएसएफ जवान कारवाईसाठी उपस्थित होते. त्यासोबतच कारवाईसाठी २ जेसीबी वापरण्यात आले. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ११ अनधिकृत वीटबांधकाम व पत्राशेडवर कारवाई करण्यात येऊन अंदाजे १६,००० चौरस.फूट क्षेत्र पाडण्यात आले आहे. याकारवाईसाठी क्षेत्रीय अधिकारी, ३ अतिक्रमण अधीक्षक, ८ बीटनिरीक्षक, १० पोलीस कर्मचारी व १५ मजूर उपस्थित होते. याकारवाईसाठी २ जेसीबी, १ ट्रॅक्टर ब्रेकर अशी यंत्रणा उपस्थित होती. याचबरोबर, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये, १० अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाई करण्यात येऊन अंदाजे १६,४०० चौरस.फूट क्षेत्र पाडण्यात आले आहे. यासाठी ४ क्षेत्रीय अधिकारी, १ अतिक्रमण अधीक्षक, ६ बीटनिरीक्षक, ३० पोलीस कर्मचारी व १५ मजूर त्याबरोबर, याकारवाईसाठी २ जेसीबीची यंत्रणा वापरण्यात आली.!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments