११ नोव्हेंबर २०२०,
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२०चे विजेतेपद मिळवले आणि नवा विक्रम केला. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा ५ विकेटनी पराभव केला आणि पाचव्यांदा विजेतेपद मिळवले. ट्रेंट बोल्टने केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे सामनावीर पुरस्कारासाठी त्याची निवड झाली. करोनाचे संकट असताना आयपीएल २०२० यशस्वीपणे पार पडले. आता चाहत्यांना २०२१ची उत्सुकता लागली आहे.

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल २०२१चा लिलाव डिसेंबरमध्ये न करता नव्या वर्षाच्या सुरूवातीला होऊ शकतो. त्याच बरोबर पुढील वर्षी आयपीएल भारतातच आयोजित केले जाणार आहे. जर बीसीसीआयने नव्या संघाला प्रवेश दिला तर स्पर्धेत काही बदल केले जाऊ शकतात.
मुंबई इंडियन्सने २०१९ आणि २०२० अशी सलग दोन वर्ष विजेतेपद मिळवली आहेत. आयपीएलमधील तो सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. गेल्या वर्षी त्यांनी चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता. या वर्षी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करुन त्यांनी विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवले.