Monday, June 15, 2026
Homeआरोग्यविषयककोरोना पॉझिटिव्ह असतानाही शूटिंगला हजर; चित्रपट अभिनेत्रीविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल

कोरोना पॉझिटिव्ह असतानाही शूटिंगला हजर; चित्रपट अभिनेत्रीविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल

कोरोना पॉझिटिव्ह असतानाही चित्रपट अभिनेत्रीने बेजबादारपणे क्वारंटाइन न राहता सार्वजनिक ठिकाणी फिरल्याने ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेनं अभिनेत्री गौैहर खान विरोधात तक्रार करून गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई महापालिकेनं ट्विटर हॅण्डलवरून या घटनेची माहिती देत कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांनाही इशारा दिला आहे. “नियम सर्वांसाठी सारखेच! कोरोना विषाणू संबंधीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अभिनेत्रीविरुद्ध बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईकरांनो, कृपया सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करा,” इशारा वजा आवाहन महापालिकेनं केलं आहे.

हेही वाचाः भाजपा खासदाराच्या सुनेचा आत्महत्येचा प्रयत्न, व्हिडीओ पोस्ट करत पतीवर केले होते गंभीर आरोप

अभिनेत्री गौैहर खान महापालिका क्षेत्रातील के पश्चिम विभागातंर्गत ओशिवरा परिसरात राहते. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी हा प्रकार समोर आल्यानंतर तक्रार दिली. त्यावरून साथरोग नियंत्रण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर चित्रपट अभिनेत्रीची कोरोना चाचणी करण्यात आली होती. चाचणीच्या अहवालानुसार अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं ११ मार्च रोजी निष्पन्न झालं. पण तरीही अभिनेत्री नियमांचं उल्लंघन करत सार्वजनिक ठिकाणी फिरत होती, चित्रपटांच्या शुटिंगमध्येही अभिनेत्री सहभागी झाली होती. आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांनी अभिनेत्रीविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments