Tuesday, December 10, 2024
Homeताजी बातमीराष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त एका तिकिटासाठी फक्त ७५ रुपये आकारण्याचा मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ...

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त एका तिकिटासाठी फक्त ७५ रुपये आकारण्याचा मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाचा निर्णय

१६ सप्टेंबर हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी यानिमित्ताने मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील अनेक चित्रपटगृहांनी १६ सप्टेंबर रोजी भारतात ‘राष्ट्रीय सिनेमा दिन’ साजरा करण्याचे ठरविले आहे. या दिवसाचे अवचित्य साधून तिकिट शुल्कात मोठी सवलत देण्याचा ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने निर्णय घेतला आहे.

१६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांना चित्रपटाच्या एका तिकिटासाठी फक्त ७५ रुपये आकारण्याचा निर्णय मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया घेतला आहे. पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, मिराज, सिटीप्राइड या बड्या चित्रपटगृहांसह देशभरात सुमारे ४ हजार चित्रपटगृहात ७५ रुपयात चित्रपटाची तिकिटं विकली जातील.

‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने नुकत्याच दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “कोरोना आणि त्यानंतरच्या काळात चित्रपटसृष्टीने विविध चढ-उतार पाहिले. आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यात जागतिक आणि स्थानिक टेंट पोलच्या पार्श्वभूमीवर चित्रपट ऑपरेटर्समध्ये सकारात्मक संख्या नोंदवली गेली आहे. या तीन महिन्यात ‘केजीएफ: चॅप्टर २’, ‘आरआरआर’, ‘विक्रम’, ‘भूल भुलैया २’ तसेच ‘डॉक्टर स्ट्रेंज’ आणि ‘टॉप गन: मॅव्हरिक’ यांसारख्या चित्रपटांना तुफान प्रतिसाद मिळाला. आता राष्ट्रीय चित्रपट दिन सर्व वयोगटातील प्रेक्षकांना एकत्र आणेल आणि प्रेक्षकांना संपूर्ण दिवस विविध चित्रपटांचा आनंद लुटता येईल. ज्या प्रेक्षकांनी कोरोना काळानंतर चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत चित्रपटगृहं पुन्हा चांगल्याप्रकारे सुरु व्हायला मोठा हातभार लावला, त्यांना धन्यवाद म्हणून मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने तिकिट शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.”

दरम्यान, “७५ रुपयांना तिकिटे देण्याच्या योजनेत सहभागी होणारे थिएटर्स त्यांच्या संबंधित सोशल मीडिया हँडलवर तपशील याबद्दल अधिक माहिती शेअर करतील. तसेच तिकिटांची किंमत फक्त ७५ रुपये असेल, पण बुकिंग अॅप्स अतिरिक्त शुल्क आकारू शकतात,” असेही असोसिएशनने स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments