Tuesday, March 18, 2025
Homeआरोग्यविषयकमुळा- मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला येणार गती..

मुळा- मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला येणार गती..

१० एप्रिल २०२१,
पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा या नद्यांचा एकात्मिकरित्या विचार करून नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पुणे महापालिकेने हाती घेतल्यानंतर आता या प्रकल्पाला ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’चा दर्जा मिळाला असून या दर्जामुळे या प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. हा दर्जा मिळण्यासाठी महापालिकेने विशेष प्रयत्न केले होते. महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवलेल्या या प्रस्तावाला मान्यता मिळावी म्हणून गेले दिड वर्ष सातत्याने पाठपुरावा केला. मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, मा.नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे तसेच मा. विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहार व संपर्काला आज अखेर मान्यता दिली.

‘नदी पुनरुज्जीवन कामाच्या अनुषंगाने जिओटेक्रिकल, इनंव्हेस्टिगेशन रिपोर्ट, हायड्रोलॉजी, हायड्रोलिक्स रिपोर्ट, एरिया असेसमेंट, एल्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, कन्सेप्ट मास्टर प्लन आदी कामे पूर्ण झालेली आहेत. नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविल्याने नदीची पूरवहन क्षमता वाढणे, नदीलगतचा रहिवासी भाग सुरक्षित होणे, नदी किनारी हरित पट्टा विकसित होणे, पब्लिक स्पेसेस अंतर्गत नागरिकांना जॉगिंग ट्रॅक, बेंचेस, उद्यान विकसित होणे, नदीलगत असलेली वारसा स्थळे जतन करणे, नदी किनारी होणारे अतिक्रमणे, राडारोडा/कचरा टाकण्यास आळा बसणार असून नदीतील पाणी स्वच्छ राहणेस मदत होणार आहे.


मुळा, मुठा व मुळा-मुठा या नद्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका, खडकी कंटोन्मेट बोर्ड व पुणे महानगरपालिका हद्दीमधून बाहत असल्यामुळे व नदीच्या जागेबाबत महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबाबत जलसंपदा विभाग, पुणे यांचाही संबंध येत असल्याने नदी पुररुज्जीवन प्रकल्प राबविणे करिता वरील सर्व संस्था मिळून स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) स्वापन करण्याची आवश्यकता होती. स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) स्थापन करणेसाठी तसेच स्पेशल पर्पज व्हेईकलला (SPV) नदीची जागा हस्तांतरित करणेवायतचा प्रस्ताव मे राज्य शासनाकडे सादर करणेस मा. मुख्य सभा, पुणेमहानगरपालिका ठ.क.१०३५, दि. २३/०२/२०१८ अन्वये मान्यता देण्यात आली होती. राज्य सरकारनेही आता हा प्रकल्प करण्यासाठी SPV ला मान्यता दिली आहे.

सदर प्रकल्प राबविताना टप्याटप्याने प्रकल्प सुरु करण्याच्या दृष्टीने तीन प्राधान्याने भामांचा विचार करण्यात आला आहे, जेणे करुन प्रकल्प कसा असणार आहे याबाबतची कल्पना या पायलट स्ट्रेच मधून पेण्यात येणार आहेत.
१. संगमपुल ते बंडगार्डन-दोन्ही काठ मिळून ९.२ किमी
२. मुंडवा ते खराडी- दोन्ही काठ मिळून ७.१ किमी
३. ऑध ते बाणेर- दोन्ही काठ मिळन ८.५ किमी.
पुणे शहराच्या सौंदर्यात भर घालणारा तसेच जन आरोग्य व पर्यावरणाला पूरक अश्या ह्या महत्वकांक्षी प्रकल्पाचे काम आता लवकरच सुरू होणार असून मुठा नदीकाठ आता सुंदर होणार.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments