Monday, July 20, 2026
Homeताजी बातमीसंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी युवा नेते राजेश आरसुळ यांच्या सामाजिक...

संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी युवा नेते राजेश आरसुळ यांच्या सामाजिक कार्याचे केले कौतुक

रस्टन कॉलनी येथील नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मावळ लोकसभेचे खासदार संसदरत्न श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते प्रभाग क्र २७ चिंचवड मध्ये रस्टन कॉलनी मधील दत्त मंदिरात जेष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन शिवसेनेचे युवा नेते राजेश आरसुळ यांनी केले होते.याला जेष्ठ नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवस चाललेल्या सदर नेत्र तपासणी शिबीरात जवळपास ५०० नागरिकांनी सहभाग नोंदवला.

यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले की, चिंचवड परिसरात अनेक ठिकाणी शिवजयंती उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या विचारांचा वारसा युवा पिढीला प्रेरणादायी ठरत आहे. प्रभाग २७ चिंचवड मध्ये चिंचवड वेताळनगर शाखेच्या वतीने प्रभागातील नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून खरे शिवसैनिक असल्याचे अधोरेखित केले.नागरिकांनी देखील या शिबिराला हजेरी लावली ही कौतुकास्पद बाब आहे.असेच सामाजिक उपक्रम राबविण्यात यावेत अशी अपेक्षा आहे असे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी मत व्यक्त केले.यावेळी त्यांच्या हस्ते अनेक नागरिकांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पिंपरी विधानसभेचे शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख वैभव थोरात, शहराध्यक्ष ऍड.सचिन भोसले, चिंचवड विधान सभा प्रमुख अनंत कोराळे,शहर संघटक संतोष सौंदनकर महेश कलाल,आदी मान्यवर उपस्थित होते.आलेल्या सर्व मान्यवरांचे शिवसेनेचे युवा नेते आणि कार्यक्रमाचे आयोजक राजेश आरसुळ यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments