Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमीफटाके पेटवताना खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या नातीचा दुर्दैवी...

फटाके पेटवताना खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या नातीचा दुर्दैवी मृत्यू

17 November 2020.

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मतदारसंघाच्या खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

फटाके पेटवताना त्यांची नात गंभीर जखमी झाली होती. चिमुकलीच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. भाजल्यानंतर तिला लगेचच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सकाळीच तिला उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला आहे.

रीता बहुगुणा जोशी या भाजपाच्या खासदार आहेत. त्यांचा मुलगा मयंक जोशी यांची सहा वर्षांची मुलगी दिवाळीत फटाके फोडत होती.

फटाके पेटवताना तिच्या कपड्यांनी पेट घेतला. आणि ती गंभीररित्या भाजली. उपचारांसाठी तिला लागलीच स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी चिमुकलीचं शरीर 60 टक्के भाजल्याचं सांगितलं. तसेच तिला उपचारांसाठी दिल्लीला हलवण्याचा सल्ला दिला.

जोशी यांच्या नातीला मंगळवारी सकाळीच एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments