ज्येष्ठ नागरिकांबरोबर कॅरम खेळत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज दुपारी प्रचाराच्या धामधुमीत थोडा ‘विरंगुळा’ अनुभवला.
खासदार बारणे यांनी कासारवाडी भागात माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. या दौऱ्यात कासारवाडी ज्येष्ठ नगरिक संघाच्या विरंगुळा केंद्रासही त्यांनी भेट दिली. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ॲड. संजय गोडसे, सचिव रघुनाथ काजळे यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी खासदार बारणे यांनी ज्येष्ठ नागरिकांना केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण निर्णयांची व योजनांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असून देशाचे अभूतपूर्व वेगाने प्रगती होत आहे. त्यामुळे मोदी हेच पंतप्रधानपदी कायम राहणे देशहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे, असे बारणे म्हणाले.
कार्यक्रम झाल्यानंतर विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसमवेत कॅरम खेळत प्रचाराच्या धकाधकीत खासदार बारणे यांनी थोडा विरंगुळ्याही अनुभवला.
कासारवाडीत माजी विरोधी पक्षनेते श्याम लांडे यांच्या निवासस्थानी बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी विजयराव गाडवे, उत्तमराव फुगे, ॲड. राजेंद्र वर्मा उपस्थित होते.
माजी नगरसेवक श्रीपाद बेलसरे, दशरथ लांडगे, पी. बी. फुगे, सतीश लांडगे, प्रशांत फुगे, लक्ष्मणराव फुगे, ॲड. अतिश लांडगे, कुणाल लांडगे, माऊली थोरात, सीमाताई बोरसे, बापूसाहेब भोसले, बाळासाहेब लांडे, गणेश संभेराव, सुहास जाधव, तुषार माने, सुरेश फुगे, संतोष टोणगे, प्रकाश जवळकर, रघुनाथ जवळकर, प्रतिभा जवळकर, साधू शंकर धावडे, अतुल दौंडकर, किरण मोटे, एकनाथ मोटे, गणेश जवळकर यांच्या घरी भेट दिली. ठिकठिकाणी फटाके वाजवून, औक्षण करून बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कासारवाडीत बारणे यांच्यासोबत माऊली थोरात, सतीश लांडगे, सीमा बोरसे, कुणाल लांडगे, देवदत्त लांडे, बाळासाहेब लांडे, संजय शेंडगे, शीतल कुंभार युवराज लांडे, नीलेश अष्टेकर आधी पदाधिकारी व कार्यकर्ते होते.
कासारवाडी प्रखंड बजरंग दलाच्या वतीने रामनवमी निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरासही बारणे यांनी भेट दिली. सर्व रक्तदात्यांचे त्यांनी अभिनंदन केले.