पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-२ने सराईत मोटारसायकल चोराला अटक करून २१ लाख ६६ हजार रुपये किमतीच्या ४० मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे वाहन चोरीचे एकूण ३४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
बावधन पोलीस ठाणे हद्दीतील नांदे गावातून स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-२कडे वर्ग करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपीचा माग काढला.
पोलिसांनी आश्पाक ईसाक पठाण (वय ३२, रा. पाडळी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याला बालेवाडी परिसरातून अटक केली. पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान त्याने अनेक मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरीच्या गाड्या मुकुंद उद्धवराव हारदास (वय २५, रा. जालना) याला विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी हारदास यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने केली


