Tuesday, December 10, 2024
Homeताजी बातमीआई तुळजाभवानी मंचकी निद्रा संपवून गर्भघरात दाखल, आज घटस्थापना….

आई तुळजाभवानी मंचकी निद्रा संपवून गर्भघरात दाखल, आज घटस्थापना….

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव आजपासून सुरु झाला आहे. दोन वर्ष कोरोनाचे निर्बंध असल्यानं उत्सवावर देखील निर्बंध होते. आता निर्बंध हटल्यानं उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच्या आधी मध्यरात्री एक वाजता देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा संपवून आपल्या गर्भ घरात दाखल झाल्या. यावेळी आई तुळजाभवानीच्या मूर्तीला पंचामृताचा विधिवत महाभिषेक करण्यात आला.

पहाटे चार वाजता तुळजाभवानीची मंदिर संस्थांचे पदाधिकारी आणि मानाचे महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. नऊ दिवसाच्या घोर निद्रेनंतर आई तुळजाभवानीचे दर्शन झाल्याने पडत्या पावसात भाविकांनी विधिवत लोटांगण घालून मोठ्या भक्ती भावाने दर्शन घेतले. महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील भाविक देखील यावेळी मोठ्या प्रमाणात तुळजापुरात दाखल झाले आहोत. ज्योत घेऊन जाण्यासाठी तरुण भक्तांनीही आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं आल्याचं पाहायला मिळत आहे.

आई तुळजाभवानीच्या मंदिरावर केलेली मनमोहक रोषणाई ही या नवरात्राचे आकर्षण ठरले आहे. नवरात्रीच्या निमित्तानं संपूर्ण तुळजापूर नगरी सजली आहे. ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची गेली 9 दिवसापासून सुरु असलेली मंचकी निद्रा संपली असून पहाटे देवीची मूळ अष्टभुजा मूर्ती सिंहासनावर स्थापित करण्यात आली. त्यानंतर देवींची आरती करण्यात आली. शारदीय नवरात्र उत्सव आज दुपारी घटस्थापनेने सुरु होणार आहे. त्यापूर्वी देवीची मूर्ती विधिवत पूजा करुन पलंगावरून मूळ सिंहासनावर नेण्यात आली. देवीची मंचकी निद्रा ही वर्षातून 3 वेळेस असते. तुळजाभवानी देवी ही देशातील एकमेव चल मूर्ती आहे, दुपारी 12 वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे.

तुळजापुरात आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे भाविकांचे प्रचंड हाल झाले. प्रज्वलित केलेल्या भवानी ज्योत छत्रीचा घेऊन न्याव्या लागत आहेत. मात्र भर पावसात देखील भाविकांचा उत्साह मात्र कायम आहे. भाविकांच्या प्रचंड संख्येच्या पार्श्वभूमीवर पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी मंदिराबाहेर निवारा नाही. तसेच बंदोबस्त करणारे पोलिस बांधव देखील पावसात भिजत आपल्या कर्तव्यावर असल्याचं पाहायला मिळालं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments