Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीमोरया युथ फेस्टिव्हल’चे गुरुवारी बक्षीस वितरण

मोरया युथ फेस्टिव्हल’चे गुरुवारी बक्षीस वितरण

२२ जानेवारी २०२०,
कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘मोरया युथ फेस्टिव्हल 2020’ चा गुरुवारी (दि. 23) बक्षीस वितरण समारंभ दुपारी 4 वाजता गंधर्व हॉल, चापेकर चौक चिंचवड येथे होणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले होते. या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. यामध्ये विविध 28 स्पर्धांतून शहरातील 4 हजारांहून जास्त युवक युवतींनी सहभाग घेतला आहे. यामध्ये बुध्दीबळ, कॅरम, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, कथा लेखन, कथा सादरीकरण, व्यंगचित्र काढणे, रायफल शुटिंग, टेबल टेनिस, फेशन शो,व्हॉलिबॉल, ऑन द स्पॉट पेंटींग, पोस्टर मेकिंग, एकांकिका, वेशभूषा नसताना एकांकिका सादरीकरण, मुक अभिनय, नकला सादर करणे, रांगोळी आणि मेहंदी अशा विविध स्पर्धांमध्ये 400 हून जास्त विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात लायन्स क्लबचे ओमप्रकाश पेठे, ज्ञानप्रबोधिनीचे मनोज देवळेकर, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक बाबू नायर, कामगार नेते इरफान सय्यद, राजेश पाटील, ज्योतिका मलकानी, किरण येवलेकर, चेतन फेंगसे, देवदत्त कशाळीकर, प्रा. शिल्पागौरी गणपुले आदी उपस्थित राहणार आहेत. या बक्षीस वितरण समारंभास यूवक युवतींनी उपस्थित रहावे असे आवाहन महोत्सवाचे समन्वयक सदाशिव खाडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments