अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच भाजप नेते मोहित कंबोज हे आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. त्यांनी सिंचन घोट्यासंदर्भात एकापाठोपाठ पाच ट्विट केले आहेत. आपण पत्रकार परिषद घेऊन लवकरच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. कंबोज यांनी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे आणि संजय राऊत या चार जणांची नावं आहेत. पाचवी जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. तसेच ‘आमचा स्ट्राईक रेट 100 टक्के’ असं देखील त्यांनी म्हटले आहे. यामध्ये आम्ही ज्यांच्यावर आरोप करतो ते शंभर टक्के तुरुंगात जातात असेच कंबोज यांना सुचवायचे आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मात्र अधिवेशनापेक्षाही अधिक चर्चा आज कंबोज यांच्याच ट्विटची सुरू आहे.
मोहित कंबोज यांनी मंगळवारी रात्री केलेल्या ट्विटमध्ये सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. मोहित कंबोज यांचा आजवरचा लौकिक पाहता त्यांनी भाकीत केलेले बहुतांश नेते तुरुंगात गेले आहेत.
नेमकं काय म्हटलंय कंबोज यांनी?
कंबोज यांनी सिंचन घोटाळ्यासंदर्भात एकापाठोपाठ पाच ट्विट केले आहेत. त्यांनी आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये चार जणांच्या नावाचा उल्लेख केला आहे. ज्यामध्ये संजय राऊत, संजय पांडे, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांनी पाचवी जागा रिक्त ठेवली आहे. तसेच आमचा स्ट्रईक रेट 100 टक्के असं कंबोज यांनी म्हटलं आहे. आम्ही ज्यांच्यावर आरोप करतो त्यांच्यावर कारवाई होतेच असं कंबोज यांना सुचवायचं आहे का असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कंबोज यांचा संपूर्ण रोख हा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.