शहरातील गुंडांवर वचक ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ‘एमपीडीए’ आणि ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्या’नुसार (मोक्का) कारवाईचा धडाका लावला आहे. या कारवाई अंतर्गत आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कुख्यात गजा मारणेचा साथीदार रूपेश मारणेवर नुकतीच ‘एमपीडीए’ची पन्नासावी कारवाई केली आहे. त्याला औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. आयुक्तांनी आज मारणेवर कारवाई करत ‘एमपीडीए’च्या कारवाईचे अर्धशतक पूर्ण केले आहे.
सराईत गुन्हेगार आणि टोळ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तांनी पहिल्यापासून जोरदार प्रतिबंधक कारवाई आरंभली आहे. गुन्हेगारी टोळ्यांवर (मोक्का) आणि स्थानिक गुंडांवर ‘एमपीडीए’नुसार कारवाई सुरू आहे. पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत 64 टोळ्यांवर ‘मोक्का’ची कारवाई केली आहे. कुख्यात गुंड रूपेश मारणे याच्यावर ‘एमपीडीए’ची कारवाई करून त्याला औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत रॅली काढण्याचा मुख्य सूत्रधार रूपेश मारणे (वय 38, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) होता. त्याच्याविरुद्ध कोथरूड, वारजे माळवाडी, स्वारगेट, येरवडा, पौड, तळेगाव दाभाडे, समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. याप्रकरणी कोथरूडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी ‘एमपीडीए’नुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत 64 कुख्यात टोळ्यांवर मोक्का’ची कारवाई केली.. कुख्यात गुंड रूपेश मारणे याच्यावर ‘एमपीडीए’ची कारवाई करून त्याला औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत रॅली काढण्याचा मुख्य सूत्रधार रूपेश मारणे (वय 38, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) होता.