Monday, April 22, 2024
Homeताजी बातमीवाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांना दिलासा, सशर्त जामीन मंजूर

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांना दिलासा, सशर्त जामीन मंजूर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाशी न्यायालयातर्फे दिलासा मिळाला आहे. ठाकरे यांना वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. राज ठाकरे यांच्यासोबत मनसेच्या वकिलांची फौज सोबत होती. नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं होतं. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली आहे. राज ठाकरेंना 15 हजारांंच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, पुढील सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे.

2014 मध्ये वाशी टोलनाक्यावर तोडफोड झाली होती. राज ठाकरेंना यापूर्वी 2018 आणि 2020 मध्ये समन्स काढण्यात आले होते. मात्र, त्यावेळी राज ठाकरे उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे राज ठाकरेंना वॉरंट काढलं गेलं. राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर उपस्थित होते. राज ठाकरेंना वॉरंट काढल्यानं मनसेचे कार्यकर्ते वाशी टोलनाका परिसरात जमा झालेले पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments