महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. ते अमित शाह यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मनसेकडून महाराष्ट्रात दोन जागांची मागणी करण्यात येऊ शकते. याच मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्लीत गेल्यावर राज ठाकरेंशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘आत्ता माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही. मला काहीही माहीत नाही. मला फक्त या असं सांगितलं त्यामुळे मी आलोय,’ असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे आणि हसत हसत ते निघून गेले.
दरम्यान, मनसेने २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. परंतु, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला होता. मात्र, गेल्या काही दोन वर्षांत राज्यात झालेल्या उलथापालथीमुळे राज ठाकरेंनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघाची जागा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याची चिन्हे आहेत, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. या जागेसाठी मनसेकडून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.