Wednesday, February 21, 2024
Homeताजी बातमीआमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते “रानजाई” महोत्सवाचे उदघाटन…

आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते “रानजाई” महोत्सवाचे उदघाटन…

भविष्याचा विचार करता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची आवश्यकता असून झाडे लावणे गरजेचे आहे तसेच लावलेल्या झाडांची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे असे मत आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने “रानजाई” महोत्सव रंग, गंध, सृजनाचा (२६ वे फुले, फळे, भाज्या, बागा, वृक्षारोपन स्पर्धा व प्रदर्शन ) चे आयोजन शुक्रवार दि. १० ते १२ मार्च २०२३ दरम्यान नियोजित महापौर निवासस्थान जागा, से.नं. २७ नं.’अ’ संत तुकाराम उद्यान शेजारी, निगडी प्राधिकरण येथे करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी आमदार अश्विनी जगताप बोलत होत्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, माजी उपमहापौर शैलजा मोरे, उप आयुक्त रविकिरण घोडके, सुभाष इंगळे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, उद्यान अधिक्षक गोरख गोसावी, आदी उपस्थित होते. तसेच शिवभूमी हायस्कूल आणि ज्यु. कॉलेज, कॅम्प एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय निगडी, ज्ञानदीप माध्यमिक आणि सौ अनुसया वाढोकर, उच्च माध्यमिक विद्यालय, यशश्वी प्राथमिक व माध्यमिक मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा, सरस्वती विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

या प्रदर्शनात ११ विभागातील बागक्षेत्रांमधील विविध घेण्यात आलेल्या स्पर्धेत विविध क्षेत्रातील व उद्योग समूहांनी सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रोत्साहनपर मदत देऊन तसेच प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना फिरता चषक देऊन गौरवण्यात आले.या महोत्सवामध्ये नागरिकांच्या मनोरंजनासाठी विशेष लाइव्ह बँड, विदूषकाचे प्रयोग, लाइव्ह पेंटिंगचे सादरीकरण तसेच वेगवगळ्या प्रकारची फुले, फळे, झाडांची रोपे खरेदी व विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. प्रदर्शन १२ मार्च पर्यंत सर्वांसाठी खुले असून ते विनामुल्य आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप आयुक्त सुभाष इंगळे, सुत्रसंचलन श्रीकांत चौगूले व आर जे अक्षय यांनी केले तर जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्व नागरिकांनी पुढील दोन दिवस सुरु असणाऱ्या “रानजाई” महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments