Tuesday, February 27, 2024
Homeबातम्याआमदार अण्णा बनसोडे यांची महावितरण अधिकाऱ्यांसोबत शहरातील नागरिकांच्या विदयुत समस्यांबाबत बैठक

आमदार अण्णा बनसोडे यांची महावितरण अधिकाऱ्यांसोबत शहरातील नागरिकांच्या विदयुत समस्यांबाबत बैठक

आमदार अण्णा बनसोडे यांनी शहरातील नागरिकांच्या विदयुत समस्यांबाबत बैठक घेतली , बैठकीच्या सुरवातीला आमदार अण्णा बनसोडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची व विद्युत समिती मधील पदाधिकारी यांची व त्या त्या भागातील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांची ओळख करून दिली . यावेळी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांनी आपआपल्या भागातील विविध समस्यांचा पाढाच आमदार बनसोडे यांच्या पुढे मांडला .

माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी यांनी पिपरी विभागातील उघड्या डी .पी. बॉक्स ची समस्या बोलून दाखवली तसेच पिंपरीमध्ये होणाऱ्या वीज चोरी बाबत लक्ष वेधले , यानंतर दापोडीच्या नगरसेविका माई काटे यांनी दापोडी परिसरात अंडर ग्राऊंड केबलींग करावे याबाबत निवेदन दिले , आकुर्डी व दत्तवाडी परिसरामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण तातडीने होत नसल्याचे इखलास सय्यद यांनी निदर्शनास आणले, विद्युत समिती सदस्य हिरालाल जाधव यांनी गांधीनगर भागातील अनियमित पणे विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले , तसेच दर पंधरा ते वीस दिवसांनी मेन सप्लाय ची संपूर्ण वायर जळून जात असल्याने त्या नंतर पूर्ण २ दिवस गांधीनगर अंधारात जाते व हे सातत्याने घडत आहे.

नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्यांचे निराकरण तातडीने करण्यात यावे , तसेच दापोडी व बोपखेल साठी वेगवेगळा स्टाफ असावा जेणे करून त्या त्या भागातील समस्यांचे निराकरण तात्काळ होईल अशा सूचना आमदार अण्णा बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना केल्या . तसेच पुढील आठवड्यात दापोडी, पिंपरी, गांधीनगर, आकुर्डी, दत्तवाडी, या भागाचा दौरा करून तेथील सर्व डीपी बॉक्स ,विद्युत तारा यांची पाहणी करून उपाययोजना करण्याचे नियोजले आहे .

सदर बैठकीला महावितरण चे अधीक्षक अभियंता सतीश राजदीप , भोसरी चे कार्यकारी अभियंता उदय भोसले , निगडी प्राधिकरणाचे सहायक कार्यकारी अभियंता श्री झोडगे , आकुर्डी चे कार्यकारी अभियंता श्री . कवडे, चिंचवड चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सौ . भोसले मॅडम , चिंचवडचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री . जाधव, पिंपरीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. चाकूरकर , प्राधिकरण सब डिव्हिजन चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. चौधरी , माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी, नगरसेविका माई काटे , सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे , आशा शिंदे , इखलास सय्यद , गंगाताई धेंडे , हिरालाल जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments