Tuesday, October 13, 2026
Homeआरोग्यविषयकआरक्षण उपवर्गीकरणाच्या महामोर्चासाठी नाशिकला जाताना आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाला अपघात

आरक्षण उपवर्गीकरणाच्या महामोर्चासाठी नाशिकला जाताना आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाला अपघात

नाशिक : अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आयोजित महामोर्चासाठी नाशिककडे जात असताना विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात आमदार गोरखे थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये आमदार गोरखे यांच्या वाहनाची दुसऱ्या वाहनाशी धडक झाली. त्यावेळी वाहनामध्ये आमदार अमित गोरखे यांच्यासह मारुती जाधव, बाबासाहेब रसाळ,महेश खिलारे , वाहनचालक रामचंद्र जाधव तसेच अंगरक्षक सूरज आणि अभिजीत उपस्थित होते.

अपघाताची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आमदार गोरखे सुखरूप असल्याची माहिती मिळाल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार अमित गोरखे हे या आंदोलनात सक्रियपणे सहभागी आहेत. उपवर्गीकरणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विविध ठिकाणी मोर्चे आणि आंदोलने आयोजित केली जात आहेत.

दरम्यान, नाशिककडे जात असताना झालेल्या या अपघातामुळे काही काळ प्रवासात अडथळा निर्माण झाला. वाहनातील सर्व व्यक्तींच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळाली असून सर्वजण सुखरूप आहेत असे कळाले आहे 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments