६ एप्रिल २०२१,
ऑल इंडिया मजलिस ए ईतेहादुल मुस्लमिन (एम आय एम ) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष , औरंगाबाद लोकसभा खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी आज दिनांक ५ मार्च २०२१ रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान पुणे कॅम्प हद्दीतील फॅशन स्ट्रीट या ठिकाणी लागलेल्या आगी मुळे झालेल्या ७००पेक्षा अधिक दुकानांचे झालेल्या नुकसानाची पाहणी केली तसेच तेथील दुर्घटना ग्रस्त व्यापारी यांचेशी चर्चा करून खालील प्रमाणे त्यांच्या अडीअडचणी व मागण्या ऐकून घेतल्या
१)मागील २७ वर्षांपासून फॅशन स्ट्रीट येथील व्यापारी सदर ठिकाणी रीतसर व्यवसाय करत असून कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे कर देखील नियमित भरत होते परंतु मागील २ वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाने कर वसुली थांबवली आहे कारण कॅन्टोन्मेंट बोर्डाला फॅशन स्ट्रीट नको असून सदर जागा मोकळी करून कॅन्टोन्मेंट बोर्डला हवी आहे अशी तक्रार व्यापाऱ्यांनी केली .
२) प्रशासनाचे असे म्हणणे कि सदर आग हि शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी परंतु व्यापाऱ्यांचे असे म्हणणे आहे कि सदर आग हि लावण्यात आली असून त्याची केंद्राने योग्य समिती करून योग्य चौकशी करावी .
३) दरम्यानच्या काळात सण आले असून अनेक व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला होता परंतु या दुर्घटनेमुळे नुकसान झाले असून कॅन्टोन्मेंट बोर्डाने त्यांच्या हद्दीतील मोकळ्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात गाळे निर्माण करून उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा .
४)कॅन्टोन्मेंट बोर्डाने व शासनाने नुकसान तपासणी करून दुर्घटना ग्रस्त व्यापारी यांना नुकसान भरपाई तात्काळ करावी .
५)पोलीस प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या व्यथा ऐकून न घेता योग्य तो पंचनामा करण्यात आला नाही अशी तक्रार काही व्यापाऱ्यांनी केली
सदर चर्चेच्या नुसार खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी मा.केंद्रीय रक्षा मंत्री ,भारत सरकार , मा. जिल्हा अधिकारी पुणे डॉ . राजेश देशमुख , CEO कॅन्टोन्मेंट बोर्ड अमित कुमार , PCB अध्यक्ष यांना निवेदन दिले तसेच त्यांनी दुर्घटना ग्रस्त व्यापाऱ्यांना आश्वासन दिले कि तुमच्या संकटात तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र शासन ,राज्य शासन ,कॅन्टोन्मेंट बोर्ड यांचेकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहील असे जाहीर केले . पुणे पोलीस आयुक्त यांचे बरोबर खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी योग्य पंचनामे करण्यासंदर्भात चर्चा केली . यावेळी एम आय एम पक्ष प्रदेश महासचिव अकील मुजावर , प्रवक्ते धम्मराज साळवे , नगरसेविका अश्विनी लांडगे,डॅनियल लांडगे , शैलेंद्र भोसले ,अबूसुफियान कुरेशी ,पुणे जिल्हा अध्यक्ष फय्याज शेख तसेच एम आय एम पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .