Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीमुंबई: गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाझेंच्या जागी मिलिंद काथे मुंबई...

मुंबई: गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाझेंच्या जागी मिलिंद काथे मुंबई क्राईम इंटेलिजन्स यूनिटचे प्रमुख

मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाची अर्थात क्राईम इंटेलिजन्स यूनिटचे प्रमुखपदी मिलिंद काथे यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. तसे आदेश आयुक्त कार्यालयातर्फे काढण्यात आले आहेत. अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

स्फोटकं आणि हिरेन हत्या प्रकरणात वाझे यांना निलंबित करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने त्यांना गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख पदावरून दूर करत निलंबित केलं होतं. त्याचबरोबर परमबीर सिंह यांचीही मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. परमबीर सिंह यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्रे देण्यात आल्यानंतर गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखपदावर नियुक्तीसाठी चाचपणी सुरू होती. या विभागातील अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या होत्या. अखेर मिलिंद काथे यांच्याकडे गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाची सूत्रं सोपवण्यात आली आहेत.

मुंबई पोलीस आयुक्त पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर हेमंत नगराळे यांनी गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या जागी २४ नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेचे प्रमुख सह आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मंगळवारी नियुक्त्यासंदर्भातील आदेश काढले. काथे यांच्याकडे गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाची जबाबदारी देण्यात आली असून, पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्याकडे खंडणी विरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments