Wednesday, June 18, 2025
Homeआरोग्यविषयकराष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका; आयसीयूमध्ये दाखल

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका; आयसीयूमध्ये दाखल

१२ जुलै २०२१,
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला आहे. त्यांच्यावर आयकॉन रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे या काल अकोला दौऱ्यावर होत्या. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बी फार्म कॉलेजमध्ये हा कार्यक्रम सुरू होता. अमोल मिटकरी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. भाषणाचा समारोप करताना शेवटी त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकड राहिली… माझ्या मनाची होतीया काहिली’ ही छक्कड खड्या आवाजात गायला सुरुवात केली. गात असताना काही क्षणात त्यांचा आवाज चिरका व्हायला लागला, तोंड किंचित वाकडे होत असल्याची जाणीव तिथं उपस्थित असलेल्या काहींना झाली. त्यामुळं काही वेळ गोंधळ उडाला. उपस्थितांनी वेळ वाया न घालवता तात्काळ मिटकरी यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

अमोल मिटकरी यांनी स्वत: एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. ‘माझी प्रकृती आता सुधारते आहे. चिंता करण्यासारखं काही नाही. कोविडचा काळ आहे. त्यामुळं स्वतःचा जीव धोक्यात घालून कुणीही मला भेटायला येऊ नये, अशी विनंती मिटकरी यांनी कार्यकर्ते, मित्रमंडळी व हिंतचिंतकांना केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments