Sunday, June 15, 2025
Homeताजी बातमीम्हाडाच्या चार हजार घरांची सोडत ७ जानेवारीला ऑनलाइन जाहीर होणार

म्हाडाच्या चार हजार घरांची सोडत ७ जानेवारीला ऑनलाइन जाहीर होणार

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून (म्हाडा) पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह सोलापूर आणि कोल्हापूरमधील ४२२२ सदनिकांसाठी काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी ६५ हजारांहून अधिक नागरिकांनी अर्ज केले आहेत. शुक्रवारी (७ जानेवारी) सकाळी दहा वाजता पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात ऑनलाइन सोडत जाहीर केली जाणार आहे.

उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाइन सोडत जाहीर होणार आहे. या सोडतीमध्ये म्हाडाच्या विविध योजनांतील २८२३ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत १३९९ सदनिका अशा एकूण ४२२२ सदनिका आहेत. या सदनिकांसाठी १६ डिसेंबपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत ८२ हजार नागरिकांनी नोंदणी केली. मात्र, त्यापैकी ६५ हजार नागरिकांनी अनामत रक्कम भरली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात ७ जानेवारीला सकाळी दहा वाजता ऑनलाइन सोडत जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.

या लॉटरीमध्ये पुण्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील ४२२२ सदनिका आहेत. त्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १५ सदनिका आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत ४४ सदनिका, म्हाडा गृहनिर्माण ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेत २८५५ सदनिका आहेत. २० टक्के सर्वसमावेशक गृहयोजनेंतर्गत पुणे महापालिका क्षेत्रात ७१९ सदनिका आणि पिंपरी-चिंचवड महापलिका क्षेत्रात ५८९ सदनिका आहेत. येवलेवाडीतील सद्गुरू रेसिडेन्सी, मोहमंदवाडीत गगन इला, कोथरूडमधील अरिवद एलान, आंबेगाव बुद्रुक येथील िवडसर काउंटी फेज-तीन, धानोरीत गुडविल ब्रिझा फेज-एक, लोहगाव येथील पनामा पार्क, येवलेवाडीत गिनी-एरिया, वाघोलीत सृष्टी, आंबेगाव बुद्रुकमध्ये स्प्रिंग हाइट्स, फुरसुंगीतील ग्रीन काउंटी फेज-दोन, घोरपडीत द किंग्ज-व्हाय, खराडीत यशविन-ऑरिझट, दिघीमध्ये कमलराज-निशिगंध, चऱ्होलीमध्ये नेक्सस-गुलमोहोर, चिखली येथे श्री-रेसिडेन्सी, डुडुळगाव येथे डेस्टिनेशन-ऑस्टिया या इमारतींमध्ये सदनिका आहेत. त्याबरोबरच चोविसावाडी, मोशी, पुनावळे, वाकड, पिंपरी, रावेत, बोऱ्हाडेवाडी, ताथवडे, थेरगाव या परिसरातील या सदनिका आहेत.

घरबसल्या पाहता येणार निकाल,

नागरिकांना घरबसल्या निकाल पाहता येण्यासाठी म्हाडाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. विजेत्यांना ई-मेल आणि लघुसंदेशाद्वारे माहिती पाठविण्यात येणार आहे. नागरिकांनी ऑनलाइन सोडत जाहीर होणाऱ्या ठिकाणी प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही, असेही माने पाटील यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments