Friday, September 29, 2023
Homeउद्योगजगतपिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाचे उत्पन्न २२१.२६ कोटीने वाढले

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाचे उत्पन्न २२१.२६ कोटीने वाढले

१६ जानेवारी २०२०,
सन २०१९-२० च्या अंदाजपत्रकामध्ये बांधकाम परवानगी विभागास जमेचे उदृदीष्ट ३५० कोटी देण्यात आले होते. १ एप्रिल २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या ९ महिन्याच्या कालावधीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बांधकाम परवानगी विभागास ५२०.८३ कोटी उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी १ एप्रिल २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ अखेर मिळालेल्या उत्पन्नाच्या तुलनेने २२१.२६ कोटीने वाढ झालेली आहे. तसेच दि. १४/०१/२०२० अखेर ५४१.७० कोटी उत्पन्न मिळाले आहे. सन २०१९-२०२० च्या अंदाजपत्रकामध्ये देण्यात आलेल्या जमेचे उदृदीष्ट ३५० कोटी हे माहे ऑक्टोंबर २०१९ या ७ महिन्याच्या कालावधीतच पुर्ण केलेने महानगरपालिकेच्या उत्पन्नात विक्रमी भरीव वाढ झाली आहे.

महापालिकेच्या इतिहासात प्रथमताच अंदाजपत्रकातील उदृदीष्ट ७ महिन्यातच पुर्ण केलेला बांधकाम परवानगी विभाग हा एकमेव विभाग आहे. या विशेष उत्पन्न वाढीबदृल श्री.राजन पाटील, सह शहर अभियंता, कार्यालयातील कार्यकारी अभियंता सतिश इंगळे, राजेंद्र राणे, श्रीरिष पोरेड्डी यांचा व विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांचा उत्कृष्ट कार्यक्षमतेबदृल गौरवपत्राची ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी स्थायी समिती सदस्य, आयुक्त, अति.आयुक्त आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments