१४ डिसेंबर २०२०,
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील हवानात अचानक बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. नवी मुंबई, पुणे सह महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाच्या सरींना सुरुवात झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून पावसाच्या रिमझिम सरी सुरू आहेत. तर आता पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतं. खरंतर, हवामान विभागानेही ९ ते १४ डिसेंबर या कालावधीत ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तविली होती.
मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आजही राज्याभर पाऊस कोसळणार असून अनेक ठिकाणी थंडीचा पारा वाढण्याची शक्यता आहे. आजही सकाळपासूनच मुंबई , ठाणे, नवी मुंबई पुणे , नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. इतकंच नाही तर पुढच्या २४ तासांत मुंबई, पुण्यासह नागपूर परिसरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
आभाळ पूर्णपणे भरलेलं असून हावेत प्रचंड गारवा पसरला आहे. सकाळीपासून पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे चिखल झाला आहे. खरंतर, या अवकाळी रिमझिम पावसाने साथीचे आजार बाळावण्याची शक्यता वाढली आहे. बेमोसमी पावसामुळे हवामानात बद्दल झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवेत प्रचंड गारवा निर्माण झाल्याने थंडीत देखील वाढ झाली आहे