Tuesday, March 18, 2025
Homeक्रिडाविश्वपुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धा ;यजमान महाराष्ट्रासह बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू उपांत्यपूर्व फेरीत

पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धा ;यजमान महाराष्ट्रासह बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू उपांत्यपूर्व फेरीत

यजमान महाराष्ट्रासह बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू यांनी आपली घोडदौड कायम राखत येथे सुरु असलेल्या ११व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पिंपरी-चिंचवड नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत आज या चारही संघांनी आपले वर्चस्व कायम राखले. पण, वर्चस्व राखून खेळणाऱ्या ओडिशाला गोल सरासरीवर आपले आव्हान गमवावे लागले.

स्पर्धेतच कर्नाटक, चंडिगड, पंजाब यांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळच्या सत्रातील सामन्यात तीन सामन्यातच ३३ गोल नोंदले गेले. उत्तर प्रदेश, ओडिशा संघांनी मोठ्या विजयाची नोंद केली. पण, ओडिशाची ही गोल स्पर्धा गोल सरासरीत पाचने कमी पडली.

हॉकी ओडिशाने गोवा संघाला १४-० असे हरवले. सुशील धनवर याने सहा गोल करून विजयाच मोठा वाटा उचलला. स्पर्धेतल सर्वात वेगवान हॅटट्रिक नोंदवताा त्याने ५, ६, ९व्या असे चार मिनिटात तीन गोल केले. त्यानंतर त्याने १२व्या मिनिटालाच काही सेकंदाच्या अंतराने दोन गोल केले. उत्तरार्धात त्याने चौथा गोल ४५व्या मिनिटाला केला.
दुसऱ्या सामन्यात बंगालने गुजरातचे आव्हान १९-० असे संपुष्टात आले. अभिषेक प्रताप याने सात गोल केले. बंगालकडून हे सर्वाधित गोल ठरले. अभिषेकने सातही गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदवले.

महाराष्ट्र अपराजित
यजमान महाराष्ट्राने दिवसातल्या अखेरच्या सामन्यात आपला दबदबा कायम राखला. त्यांनी आज बिहारचे आव्हान ५-१ ने मोडून काढत सलग तिसऱ्या विजयासह बाद फेरी गाठली. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे आजचे पाचही गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदवले गेले. सामन्याच्या १४व्या मिनिटाला प्रताप शिंदेने पहिला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावला. त्यानंतर त्यांना आघाडी वाढवण्यासाठी थेट उत्तरार्धाची वाट पहावी लागली. त्या दरम्यान, बिहारच्या आक्रमकांनी सातत्याने महाराष्ट्राच्या बचाव फळीची परिक्षा पाहिली. त्यांनीही तीन कॉर्नर मिळविले. पण, महाराष्ट्राच्या बचाव फळीने ते परतवून लावले. ़

उत्तरार्धात महाराष्ट्राने खेळात वेग आणला. याचा फायदा झाला. बिहारच्या गोलकक्षात मुसंडी मारत त्यांनी एकामागून एख कॉर्नर मिळविले आणि आपले लक्ष्य साधले. सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला मात्र त्यांचा बचाव भेदला गेला. बिहारच्या उदय बाराने हा गोल केला. गटात बरोबरीने चालणाऱ्या या दोन संघातील हा सामना निर्णायक होता. महाराष्ट्राने बाजी मारून ९ गुणांसह बाद फेरी गाठली. बिहार दुसऱ्या स्थानावर राहिले.

सकाळच्या सत्रातील तिसऱ्या उत्तर प्रदेशाने आसामचा ६-० असा पराभव केला. जी गटात उत्तर प्रदेश संघाने आपले सर्व साखळी सामने जिंकले. त्यांनी ९ गुणांसह अव्वल राहत बाद फेरी गाठली. उत्तर प्रदेशासाठी महंमद अमिर खान, सैफ खान यांनी दोन दोन गोल केले.

दुपारच्या सत्रात झारखंडने केरळाचे आव्हान २-१ असे संपुष्टात आणले. जी गटातील या सामन्यात झारखंडचे सहा, तर केरळाचे ३ गुण झाले. दोन्ही संघ बाद फेरीपासून दूर राहिले.

अ गटातून तमिळनाडूने अखेरच्या सामन्यात हिमाचल प्रदेशाचा ११-० असा पराभव वकेला. कार्ति एस. याचे गोल पंचक त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. या विजयाने त्यांनी बाद फेरीत प्रवेश मिळविला. ते गटात सहा गुणांसह अव्वल आले, तर हिमाचल प्रदेशाला ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

छत्तीसगडने मिझोरामचा ६-१ असा पराभव करून गटात तिसरे स्थान मिळविले.

निकाल –

  • गट एफ – ओडिशा १४ (सुशील धनवार ५, ६, ९, १२, १२, ४५वे, मांग्रा भेंग्रा ७, २२वे, पात्रस तिर्की २०वे, अभिषेक लाक्रा २८वे, प्रकाश बार्ला ३६वे, प्रसाद कुजुर ४७वे, बिजू एक्का ५८वे, अजय कुमार एक्का ६०वे मिनिट) वि.वि. गोवन्स हॉकी ० मध्यंतर ९-०
    हॉकी बंगाल – १९ (अभिषेक प्रताप सिंग २,१२, १४, २५, ३४, ३७, ३९ वे , रौशन कुमार ९, ३८वे, अवॉय एक्का १६वे, कुंजन टोपनो १८, ३०वे, नितिश नेउपाने २१, ३५, ५३वे, संजय पासवान २६वे, सौरभ कुमार सिंग ४४, तरणवीर सिंग ४७, ५४वे मिनिट) वि.वि. हॉकी गुजरात ०. मध्यंतर १०-०
  • गट जी – उत्तर प्रदेश ९ (मोहंमद आमीर खान १ले, ७वे, मोहंमद सैफ खान ८, ४३वे, रिषभ साहु २१वे, दीपक पटेल ५०वे मिनिट) वि. वि. आसाम हॉकी ०.
    झारखंड २ (राजेंद्र ओरम ३६वे, संदीप मिंज ५२वे मिनिट) वि.वि. केरळा १ (अजिश रेजी ५९वे) मध्यंतर ०-०
  • गट अ – हॉकी युनिट ऑफ तमिळनाडू ११ (कार्ती एस. ९, ११, ३७, ३९, ४३वे, सुंदरापंडी २९, ३५, ४७वे, पृथ्वी जी एम, ३३वे, षण्मुगम पी ४२वे., सिलव्हर स्टॅलिन ५३वे मिनिट) वि.वि. हॉकी हिमाचल प्रदेश ० मध्यंतर ३-०
  • गट एच – छत्तीसगड ६ (कार्तिक यादव १ले, ३५वे, जनैद अहमद ४०वे, ४२वे, ५१वे, सुखदेव निर्मळकर ४५वे मिनिट) वि.वि. हॉकी मिझोराम १ ( लार्लेमडिका २९वे) मध्यंतर १-१ हॉकी महाराष्ट्र ५ (प्रताप शिंदे १४, ४१, ४२वे, तिकारा थकुला ३७वे, वेंकटेश केंचे ४३वे मिनिट) वि.वि. हॉकी बिहार १ (उदय बारा ६०वे मिनिट) मध्यंतर १-०
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments