मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे पुणे -लोणावळा सेक्शन वर रविवार दिनांक २१ जानेवारी रोजी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. पुणे-लोणावळा सेक्शनवर अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवार दिनांक २१ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे, पुणे विभागाने दिली आहे. ब्लॉक कालावधीत पुणे – लोणावळा -पुणे दरम्यान लोकल गाड्या रद्द राहतील.
अप उपनगरीय गाड्या रद्द :-
१. पुण्याहून लोणावळा साठी ०९.५७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६२ रद्द राहील.
२. पुण्याहून लोणावळा साठी ११.१७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६४ रद्द राहील.
३. पुण्याहून लोणावळा साठी १५.०० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६६ रद्द राहील.
४. शिवाजीनगरहून तळेगाव करीता १५.४७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८८ रद्द राहील.
५. पुण्याहून लोणावळा साठी १६.२५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६८ रद्द राहील.
६. शिवाजीनगर वरून लोणावळा करीता १७.२० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५७० रद्द राहील.
अभ्यास बुडाला तर रामलल्लाही खुश होणार नाही, सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी
मेल/एक्सप्रेस ट्रेनचे रेग्युलेशन:-
गाडी क्रमांक १२१६४ एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये ०३.३० तास रेग्युलेट करण्यात येईल.
वरील मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.