Wednesday, January 22, 2025
Homeताजी बातमीमहाराष्ट्रात माध्यम स्वातंत्र्य धोक्यात.. आमदारच पत्रकारांना शिविगाळ मारहाण करू लागले..

महाराष्ट्रात माध्यम स्वातंत्र्य धोक्यात.. आमदारच पत्रकारांना शिविगाळ मारहाण करू लागले..

पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी आज पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे.. यात संदीप महाजन हे जखमी झाले असून “किशोर पाटील यांच्याकडून आपणास आणि आपल्या कुटुंबाच्या जवितास धोका असल्याची तक़ार” महाजन यांनी पोलिसात केली आहे.. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मिडिया परिषदेने आमदार किशोर पाटलांच्या या मुजोरी चा तीव्र शब्दात धिक्कार केला असून किशोर पाटील यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे..

पाचोरा येथील एका घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती.. त्याचा राग धरून किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती.. ही क्लीप व्हायरल झाल्यावर आमदारांनी साळसुदपणे शिविगाळीचे समर्थन देखील केले होते.. या घटनेची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रात पत्रकारितेच्या जगतात उमटली होती.. मात्र तेव्हा संदीप महाजन यांनी समन्वयाची, सामंजस्याची भूमिका घेतली.. तरीही आमदारांची खुमखुमी थांबत नव्हती.. संदीप महाजन आज रेल्वे आंदोलनाची बातमी कव्हर करून घरी परतत असताना चार पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला..नगरपालिकेसमोर ज्या चौकात हल्ला झाला तो चौक महाजन यांचे स्वातंत्र्यसैनिक वडिलांच्या नावानं ओळखला जातो.. येथेच त्यांना लाथा बुक्कयांनी बेदम मारहाण केली गेली .. महाजन त्यात गंभीर जखमी झाले आहेत.. संदीप महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली असून किशोर पाटलांनीच आपल्यावर गुंडाकरवी हल्ला केल्याची तक्रार केली आहे..
सत्य बातमी देणारया पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या घटना महाराष्ट्रात सातत्यानं घडत आहेत.. माध्यमांच्या प्रतिनिधींना काम करणे अशक्य झाले असून राज्यात माध्यम स्वातंत्र्यच धोक्यात आले असल्याचा आरोप एस.एम देशमुख यांनी केला आहे..पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत.. मुख्यमंत्र्यांनी पाचोरयाचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी एस.एम. देशमुख यांनी केली आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments