प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी गायिलले महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड प्रस्तुत मराठी मराठी धर्म माझा मराठी हे “”मी मराठी”” गीत महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी प्रकशित तसेच प्रसारीत होणार आहे. कवी राजन लाखे यांच्या लेखनीतून साकार झालेल्या मराठी बाणा प्रज्वलीत करणा-या या रचनेवर आनंद लुंकड यांनी गीताला साजेसा असा संगीताचा साज चढवलेला आहे. या गाण्याचे चित्रिकरण सासवडच्या परिसरात झाले असून या गाण्याच्या माध्यमातून तलवारीचा बाज, मराठी माती, मराठी सामर्थ्य, मराठी शेतकरी, मराठी तत्वज्ञानाचे विद्यापीठ ज्ञानेश्वर माऊली, तुकाबाचे दर्शन प्रेक्षकांना होणार असून आनंद शिंदे यांच्या जादूई कंठातून मराठीचे वैविध्य ऐकावयाची पर्वणी रसिकांना लाभणार आहे.
या गाण्याचे वीडियो दिग्दर्शन विनोद जामदाडे यांनी केले असून एम. के. स्टुडिओ पुणे चे संचालक मछिंद्र धुमाळ हे सहनिर्माते आहेत. मराठी माणसाच्या मनातील भावनांना साध्या सोप्या योग्य शब्दात गुंफलेल्या या गीताने मराठी माणसाचे मराठीपण, मराठी भाषेवरचे प्रेम, मराठी बोलीची आस्था नक्कीच जागृती करणारी ठरेल असा विश्वास गायक आनंद शिंदे यांनी व्यक्त केला आहे.