राज्यात सत्तांतर झालं अन् तेव्हापासून हिंदुत्वाचा मुद्दा अधिक गडद झाला. शिंदे गट आणि भाजपने तो अधिक आक्रमकतेने मांडला. या हिंदुत्वाच्या मुद्द्याच्या आखाड्यात आता मनसेही उतरली आहे. मनसेने नवं घोषवाक्य आता जाहीर करण्यात आलं आहे. मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक आशा प्रकारचे बॅनर मनसेकडून आता मुंबईत अनेक ठिकाणी लावण्यात आलेत. मनसेच्या वतीने राज्यभर सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे.
मुंबईत पोस्टर…
मी हिंदवी रक्षक मी महाराष्ट्र सेवक सदस्य नोंदणीसाठी मनसेचे हे नवीन घोषवाक्य समोर आलंय. मनसेच्या वतीने राज्यभर सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे यामध्ये मी हिंदवी रक्षक,मी महाराष्ट्र सेवक या वाक्याचा वापर करण्यात आला आहे अशा प्रकारचे बॅनर मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.
राज ठाकरे पुण्यात…
राज ठाकरे सध्या पुण्यात आहेत. त्यांच्या उपस्थितीत मनसेच्या नव्या सदस्यांशी नोंदणी होत आहे. राज ठाकरे यांचं तिथं जोरदार स्वागत झालं. ढोलपथकाच्या विशेष वादनात त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी मनसेचे नेते उपस्थित होते. तसंच मनसेच्या या सभासद नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मोठ्या संख्येने लोक सदस्य नोंदणीसाठी उपस्थित आहेत.
राज ठाकरे परप्रांतीय आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक झालेले दिसायचे. पण सध्या राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक आक्रमकपणे बोलताना दिसतात. नुकतंच त्यांनी मुंबईत प्रभादेवीतील रविंद्र नाट्यगृहात मनसैनिकांचा मेळावा घेतला तिथेही ते आक्रमकपणे बोलताना दिसते. आता त्यांनी “मी हिंदवी रक्षक,मी महाराष्ट्र सेवक”, असा नवा नारा दिला आहे.